बोकड आणि माकड

bookmark

फिरायला गेला बोकड
धावत आले माकड
 
दोघे गेले हॉटेलात
बसून खाला मटारभात
 
मालक म्हणतो द्या पैसे
दोघांनी मिळून दिले ठोसे
 
माकडाने मारली उडी
पटकन पळवली सुपारीची पुडी
 
दोघे गेले सुपारी खात
मालक बसला चोळत हात