नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

bookmark

शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे
या झर्‍याचा सूर आता मंद झाला रे

झोपल्या गोठयात गाई, साद वा पडसाद नाही
पाखरांचा गलबला ही बंद झाला, बंद झाला रे

सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे

नीज रे आनंदकंदा, नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्‍यांचा छंदताला, छंदताला रे