चक्रव्यूह नव कोकण

bookmark

माझे नाव कोंकण
घरापुढे अंगण
 
अंगणात रांगोळी
मागे-पुढे झाडे वेली

माझ्या घरात नाही घाई
वाटेल तेव्हा झोप येई
 
उठा उठा तोंड धुवा
गाई-म्हशीचे दूध प्या 

झाडामाडा लावा पाणी
नारळांच्या भरल्या गोणी
 
दगड धोंडे लाल माती
तांदुळाची भरली पोती
 
नाही गडबड नाही धडपड
पिठले भात खाउ रग्गड
 
कित्याक गो माका तुका
अशी इथे ऐका भाषा
 
वाजले किती बघू नका
मुंबईला जाउ नका!