आयत्या बिलात नागोबा

bookmark


एकदा एका नगोबाने
घर बांधायचे ठरवले

कुडाळ आणि फावडे घेऊन
कामासही लागले

इतक्यात आले मुंगूसबुवा
हळूच समोर अवतरले

पळता पळता नगोबाचे 
कुडाळ आणि फावडे हरवले 

तेव्हापासून नागोबा
आयत्याच  बिळात राहू लागले!