हासा मुलानो हासा

bookmark

हसा मुलानो हसा
प्रकाशातले तारे तुम्ही
अंधरावर रुसा
हसा मुलानो हसा

तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा पाणी
आनंदाच्या शिकरावरती
खुशाल जाउन बसा  
हसा मुलानो हसा

रडणे ना हा धर्म आपुला 
ह्सण्यासाठी जन्म घेतला
भारतभूच्या आदर्शाचा
मनी उमटू दे ठसा
 हसा मुलानो हसा

सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा अरुण तो बाळानो रे
तुम्हा खुणवितो कसा 
 हसा मुलानो हसा

प्रकाशातले तारे तुम्ही
हसा मुलानो हसा
अरे हसा ना!