नाही कुणा नामार
थांबा थांबा शत्रुंनो
पाउल मागे घ्या जरा
बंदुकीची गोली येइल
ठो ठो ठो, मागे सरा
पी पी पी पी वाजली
रणभेरी ही दुमदुमली
खट खट खट सट सट सट
डोकी उडवू भराभरा
हा शिवाजी, हा बाजी
शिवबाचा हा तानाजी
खण खण खण दण दण दण
तलवारीचा ताल धरा
ही विमाने, हे रणगाडे
सैनीकांचे करू कडे
धाड धाड धाड धुडूम धुडूम धुडूम
गोळे फेकू भराभरा
शत्रूला या ठार करा
तिरंगी झेंडा उंच धरा
फड फड फड थड थड थड
भारत अमुचा विजयी करा
