जेगाचि मलक जगती आला
जगाचा मालक जगती आला
देवाचे घर बाई पाहु चला
चला तयाला भेटू चला
देवाचे घर बाई गुराचा गोठा
नाही त्या ओटा नि खिडक्यांचा तोटा
देवाचे घर बाई पाहु चला
चला तयाला भेटू चला
देवाच्या घराला शेणाची लादी
मउमउ गवताची अंथरली गादी
देवाचे घर बाई पाहु चला
चला तयाला भेटू चला
देवाच्या घराला चंदोबा दिवा
हवा वाजविते मंजुळ पावा
देवाचे घर बाई पाहु चला
चला तयाला भेटू चला
देवाची जमली गुरांशी गट्टी
झाडे वेली वारा अंगाई गाती
देवाचे घर बाई पाहु चला
चला तयाला भेटू चला
जगाचा मालक जगती आला
देवाचे घर बाई पाहु चला
चला तयाला भेटू चला
