जगी आनंदी आनंद झाला

bookmark

पोर्णिमेचा चंद्र जसा
सूर्याच्या तेजासारखा
गुरागोठी ख्रिस्त जन्मा आला
जगी आनंदी आनंद झाला

चकाकते मुख त्याचे हिर्‍यावाणी
तारका वस्त्र न्हाला आला जगी
देव मानव होऊन आला
जगी आनंदी आनंद झाला

पापी अंधकार होता सारा जगी
अडकुनी पाप नाही पुण्य उरी
आम्हा तारण्या प्रगट झाला 
जगी आनंदी आनंद झाला