आम्हां नाहीं अभ्यास केला

bookmark

दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पीन
पीन शोधण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


दुपारचे वाजले चार
आईनी दिला मार
मार खाउन रडण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


संध्याकाळचे वाजले पाच
ताईने केला नाच
नाच बघण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
तुकडे उचलण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला


रात्रीचे वाजले नउ
घरात शिरली माउ 
माउ हाकलण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
टीव्ही वरची गंमत पहा  
टीव्ही बघण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला
 
रात्रीचे वाजले अकरा
बिल्डिंगमध्ये शिरला बकरा  
बकरा हाकलण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला
 
रात्रीचे वाजले बारा
आईचा चढला पारा
तिला शांत करण्यात एक तास गेला
आम्ही नाही अभ्यास केला