मुक्तिप्रदता त्राता

bookmark

मुक्तीप्रदाता त्राता, आज धरेवार आला
धावा पळ ना थांबा, दुते निरोप दिधला
 
भूवर शांती सकला, स्वर्गी महिमा इशा
आज जन्मला त्रता, सकल उजळल्या दिशा
मुक्तीप्रदाता त्राता, आज धरेवार आला
धावा पळ ना थांबा, दुते निरोप दिधला
 

मेंढपाळ हो, धावा, गोशाली त्या शोधा
मारिया अंकी ख्रिस्ता, पाहुनि विसारा विपदा
मुक्तीप्रदाता त्राता, आज धरेवार आला
धावा पळ ना थांबा, दुते निरोप दिधला
 

सोडूनि अपूल्या कळपा, शोधा येशूराया
तोचि भवभयहर्ता, नमा तयाच्या पाया
मुक्तीप्रदाता त्राता, आज धरेवार आला
धावा पळ ना थांबा, दुते निरोप दिधला