मनाची पिल्ले

bookmark

आमच्या मनीला
पिले झालीत छान
एक आहे काळे
एक गोरेपान
गोऱ्यापान बाळाचे
डोळे आहेत निळे
काळे काळे पिल्लू
फार करते चाळे
मनीच्या बाळाच
करायच बारस
पाहुण्या माउना
दुध देऊ गारस
गोऱ्या बाळाच
नाव ठेऊ नीलम 
काळ्याच सांगू?
त्याच नाव द्वाडम!