जो जो गाई अंगाई गाते
जो जो गाई अंगाई गाते,
बाळा माझ्या नीज ना
ज्योत मंदावली,
पेंगते साऊली
पानोपानी वारा हलेना,
बाळा माझ्या नीज ना
पाऊलचाळा, घुंगूरवाळा,
का नीज नाही राजा तुला
इवल्या पापण्या शिणल्या ना,
बाळा माझ्या नीज ना
डोळे फुलाचे मिटले गं बाई,
ओठांत दाटून ये जांभई
बाळास माझ्या आता निजू द्या,
काऊ चिऊ या सारे उद्या
बाळा माझ्या नीज ना
