आला पालनहार

bookmark

प्रमुदित हो संसार
तुझा हा आला पालनहार

सजवा तोरण बनवा हार
उठा करा प्रभूचा सत्कार
उघडा उघडा अंतरद्वार
आला जीवनाधार
तुझा हा आला पालनहार
प्रमुदित हो संसार
तुझा हा आला पालनहार


परमेशचा पुत्र महान
मनुजा दिधण्या गौरवदान
मारिया उदरी घेई त्यजुनि स्वर्गदार
तुझा हा आला पालनहार
प्रमुदित हो संसार
तुझा हा आला पालनहार

दिनहुनि दीन हा दिसे
गुरा गोठी पहुडला असे
तोचि परी परमेश प्रभू असे
त्याचा जयजयकार