वारा

bookmark

वार्‍या वार्‍या पंखांच्या पर्‍या
डोंगर दर्‍या घुमतो बर्‍या
पाने हलवतो, लाटा उठवतो
कपडे सुकवतो, होडी चलवतो
ढगांना आणतो, पाउस पाडतो
दिसत नाही येतो कुठून?
कळत नाही जातो कुठून?