परी
परी असते गोरी
परी असते खरी
परीच्या गळ्यात असते
सोन्याची सरी
परी हसते गालात
परी नाचते तालात
परी अशी चालते
आपल्याच तोर्यात
परी असते इवली
चिमानिशी भावली
अंग तीचे मौ जणू
सायं असे सावली
काल मला दिसली
खिड़की मध्ये बसली
खर सांगते परी
माला बघून हसली
