दहीहि दिशा दिसे तरण

bookmark

दाहिही दिशांना दिसले तारण
म्हणूनी गायन मोदे करा

नवे गीत गाउ आपल्या प्रभुला
तयाच्या कर्माला सीमा नाही हो
आपुले तारण दाविले जगाला
त्याने इस्रायला आठविले

दाहिही दिशांना दिसले तारण
म्हणूनी गायन मोदे करा
सकल जनानो स्तवा प्रभूराया
मधुर वद्यास वाजवूनि

दाहिही दिशांना दिसले तारण
म्हणूनी गायन मोदे करा